प्रतिनिधी /बेळगाव
एम. व्ही. हेरवाडकर शाळेमध्ये इंग्रजी विषयाबद्दल नुकतेच प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनात 100 विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेविषयी वेगवेगळे मॉडेल्स, चार्ट, स्कीट, स्लाईड शो, हस्ताक्षर या माध्यमातून माहिती सादर केली. प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप चिटणीस, ज्ञानेश कलघटगी, मर्लिन कोरिया, प्राचार्य सुनील कुसाणे, उपप्राचार्य अरुण पाटील, शर्मिला देशपांडे, मानसी अरवंदेकर, प्रेमा रायकर, वरदा फडके, सीमा देसाई, लक्ष्मी पाटील आदी उपस्थित होते.
मर्लिन कोरिया यांनी इंग्रजी भाषा जागतिक भाषा झाल्याने तिचा अभ्यास करावा आणि यामुळे कोणकोणते फायदे होतात याची माहिती दिली. सुनील कुसाणे यांनी इंग्रजी भाषेमधून संभाषण कसे करावे याची माहिती दिली. प्रारंभी स्वागतगीत झाल्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. सूत्रसंचालन राजश्री गोजगेकर आणि प्रसाद हर्डीकर यांनी केले. प्रदर्शनाची माहिती प्रिती मिश्रा व तेजस राणे यांनी दिली. मंजुषा कळसपगोड यांनी आभार मानले.