Tarun Bharat

Kolhapur : शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन; दुर्मीळ शस्त्रास्त्रे पाहणी संधी

शिवकालीन युद्धकला क्रीडा प्रशिक्षण व शस्त्र अभ्यास केंद्रातर्फे आयोजन; 1200 हून अधिक

कोल्हापूर प्रतिनिधी

कोल्हापूर मर्दानी खेळ खेळ शिवकालीन युद्धकला क्रीडा प्रशिक्षण व शस्त्र अभ्यास केंद्रांच्या वतीने आज मंगळवारी खंडेनवमीपासून (दि. 4 ऑक्टोबर) तीन दिवस शिवपूर्वकाळ, शिवकाळ आणि शिवउत्तर काळ या काळातील अत्यंत दुर्मीळ अशा शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी पेठेतील फिरंगाई तालीम जवळ असणाऱ्या कोल्हापूर मर्दानी खेळ येथे हे प्रदर्शन भरणार आहे. मंगळवार ते गुरूवारपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाचा लाभ अबालवृद्धांनी घ्यावा, असे आवाहन प्रशिक्षक व शिवकालीन शस्त्रअभ्यासक तथा कोल्हापूर मर्दानी खेळाचे प्रमुख विनोद साळोखे-सरदार यांनी केले आहे. प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यत पाहण्यास खुले राहणार आहे.
भारताच्या इतिहासात युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य, त्याकाळात शिवरायांच्या मावळय़ांनी गनिमीकाव्याने गनिमाविरोधात लढताना गाजविलेले शौर्य,.दिलेले बलिदान याचे मोल अनमोल आहे. शिवरायांच्या मावळय़ांनी युद्धात वापरलेले शस्त्रs तर त्यांच्या शौर्याचा इतिहास गौरवशाली आहे. या शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनाच्या रूपाने शिवरायांच्या मावळय़ांच्या पराक्रमांचे साक्षीदार असणारी शस्त्रs पाहण्याची संधी लाभणार आहे. शिवकाळाबरोबरच शिवपूर्व काळातील आणि शिवउत्तर काळातीलही शस्त्रs या प्रदर्शनात आहेत. विनोद साळोखे-सरदार यांनी मेहनतपूर्वक या दुर्मीळ अशा ऐतिहासिक शस्त्रांचा संग्रह केला आहे. नवरात्रोत्सव आणि दसऱयाचे औचित्य साधून ही शस्त्रs अबालवृद्धांना पाहता यावीत, यासाठी त्यांनी प्रदर्शनाचे आयोजन केले.

आज खंडेनवमी दिवशी शस्त्र पूजनाने प्रदर्शनाचे उद्घाटन
आज मंगळवारी खंडेनवमी दिवशी सकाळी 10 वाजता पारंपरिक पद्धतीने शस्त्रांचे पूजन करून प्रदर्शनाचे औपचारीक उद्घाटन शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव-सरकार, अजित उर्फ पिंटू राऊत यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवराज नाईकवाडे यांच्या उपस्थित होणार आहे. या प्रदर्शनाला जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे हे देखील भेट देणार आहेत. या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विनोद साळोखे-सरदार यांनी केली.

प्रदर्शनातील काही दुर्मीळ शस्त्रांचे नावे
गुर्ज, झुल्फिकार, विटा, धोप, माडू, गुलई, अरबी, हैदराबादी कट्य़ार, नायर, तलवार, गेंडा आणि हत्तीच्या कातड्य़ाच्या ढाली, ढासणीच्या बंदुका आणि तोफा, गड-किल्ल्य़ांच्या दरवाजांची कुलपे, तसेच अनेक प्रकारचे भाले, कडीगोळा, कुऱ्हाडी, विविध राज्यातील, विविध देशांतील असंख्य दुर्मीळ शस्त्रे या प्रदर्शनात नवरोत्सवानिमित्त पाहण्यास मिळणार आहेत.

नवरात्रोत्सातील खंडेनवमी, दसरा सणांचे औचित्य साधून दुर्मीळ शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. पालकांनी आपल्या पाल्यांसह प्रदर्शनाला भेट द्यावी, शाळांनीही विद्यार्थ्यांना पाठविण्यासाठी पुढाकार घ्यावा, सर्वांसाठी प्रदर्शन मोफत खुले आहे.
विनोद साळोखे-सरदार, शस्त्र अभ्यासक

Related Stories

कृषी, कामगार विधेयकात दुरुस्ती करावी

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात वैद्यकीय संघटनांचा कोरोना टास्क फोर्स स्थापन

Archana Banage

शेळेवाडी- चंद्रे दरम्यान दिसलेला प्राणी बिबट्या नसून तरस

Archana Banage

कोरोना नियंत्रणासाठी `सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र’

Archana Banage

कोल्हापूर : नव्वदच्या दशकातील नोकरीचे सर्चइंजिन ‘दिलीप गुळवणी’

Archana Banage

शिरोळ तालुक्यातील हरोलीत विजेचा धक्क्याने विजेच्या पोलवरतीच वायरमनचा मृत्यू 

Archana Banage