नवी दिल्ली
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येत्या जून महिन्यामध्ये रेपो दरामध्ये 50 बेसिस पॉइं&टसने वाढ करण्याची शक्यता स्टेट बँक ऑफ इंडियाने अर्थात एसबीआयने व्यक्त केली आहे. एसबीआयने यासंदर्भात एक संशोधन अहवाल तयार केला आहे. सदरच्या अहवालामध्ये जून आणि ऑगस्ट दोन्ही वेळी रेपोदरामध्ये वाढ केली जाणार असल्याचे सांगतिले जात आहे.
परवाच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेने दर जैसे थे ठेवले होते. रिझर्व्ह बँक सध्या महागाई दरावर लक्ष ठेवून आहे. एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन रिझर्व्ह बँक आगामी काळामध्ये महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रेपोदरात वाढीचा निर्णय घेऊ शकते, असे एसबीआयने म्हटले आहे. एकंदर जूनमध्ये 50 बेसिस पॉईंटची वाढ रेपो दरामध्ये होऊ शकते.