ऑनलाईन खरेदीची मार्च महिन्यातील आकडेवारी सादर
नवी दिल्ली
ः प्रेडिट कार्डच्या आधारे चालू वर्षातील मार्च महिन्यात ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरुन जवळपास 68,000 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा खर्च करण्यात आला आहे. सदरचा खर्च दुकानांमधील कार्ड स्वॅप करण्यात आलेल्या पेमेन्टच्या तुलनेत जवळपास 30,000 कोटी रुपये अधिक आहे. यावरुन लोकांचा कल ई कॉमर्सकडे किती वेगाने वाढत आहे स्पष्टपणे दिसून येते.
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) यांच्या ताज्या आकडेवारीनुसार 7.3 कोटी क्रेडिट कार्डधारकांनी ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून खरेदीवर 68,327 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तसेच दुकानांवर कार्ड मशीनवर स्वॅप करुन 38,377 कोटी रुपयांचे पेमेन्ट करण्यात आले आहे.
अन्य नोंदी…
आरबीआयकडून प्रथमच ऑनलाईन व पॉईंट ऑफ सेलमधील व्यवहारातील वेगवेगळे आकडे सादर
देवाणघेवाणीच्या संख्येत क्रेडिटकार्डचा वापर करुन ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या मदतीने 11 कोटी रुपयांचे पेमेन्ट तर पीओएसच्या मदतीने 11.1 कोटीची देवाणघेवाण
एकूण मिळून पेडिट कार्डच्या आधारे मार्च महिन्यात तब्बल एक लाख कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.