आजकाल बाजारात अनेक प्रकारचे शॅम्पू पाहायला मिळतात. केसांच्या वाढणाऱ्या समस्येसाठी प्रत्येकाजण चांगल्या शॅम्पूच्या शोधात असतो. पण काही शॅम्पू वापरल्यानंतर केस आणखी कोरडे आणि फ्रिजी होतात. हा गुंता सोडवणे अवघड जाते.असं जर होत असेल तर तुम्ही तुमचा शॅम्पू चेक करा. शॅम्पूमध्ये आढळणारे सल्फेट केस कोरडे आणि निर्जीव बनवतात. कलर केलेल्या केसांसाठी सल्फेट मुक्त शॅम्पू वापरण्याची शिफारस केली जाते. पण सल्फेट सर्व प्रकारच्या केसांचे नुकसान करते.
शॅम्पू मध्ये सल्फेट आढळले तरी केस सहज स्वच्छ होतात. पण त्यामुळे केस आणखी कोरडे आणि फ्रीजी होतात. जर तुमचे केस तेलकट नसतील तर फक्त सल्फेट फ्री शॅम्पू वापरा. सल्फेट मिश्रित शॅम्पू केसांमधील नैसर्गिक तेल काढून टाकतात. ज्यामुळे केस अत्यंत खराब होतात आणि ठिसूळ होतात.जर टाळू किंवा त्वचा संवेदनशील असेल तर सल्फेट मिश्रित शॅम्पू टाळणे चांगले आहे. सल्फेट संवेदनशील त्वचेवर जलद प्रतिक्रिया देते. त्यामुळे त्वचेवर इरिटेशन, जळजळ, खाज आणि सूज येऊ शकते.केसांमध्ये तुम्ही कलर ट्रीटमेंट केली असेल तर सल्फेट फ्री शॅम्पू वापरावा. सल्फेटमुळे केसांचा रंग लवकर निघतो. सल्फेट फ्री शॅम्पू मध्ये फेस कमी असला तरी केसांचा ओलावा टिकवून ठेवतो. कारण रंगामुळे केसांचे तेल निघून जाते आणि सल्फेट शॅम्पूने केस धुतले तर ते पूर्णपणे खराब होतात.


previous post
next post