वृत्तसंस्था /मुरैना
दिवाळीपूर्वी मध्यप्रदेशच्या मुरैना जिल्हय़ात एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुरैना येथील एका पटाक्यांच्या गोदामात स्फोट झाला असून यामुळे इमारत जमीनदोस्त झाली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. स्फोटामुळे पूर्ण परिसर हादरून गेला आहे. या इमारतीत अनेक भाडेकरू राहत होते आणि यात जमील खान यांचे कुटुंब सामील होते. जमीन यांची पत्नी आणि त्यांच्या मुलीसह आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. सिलिंडर स्फोटामुळे ही दुर्घटना घडली असावी असे मानले जात आहे. प्रशासनाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले होते. ढिगाऱयाखालून एका मुलीला सुखरुप बाहेर काढण्यास यश मिळले. तर या दुर्घटनेनंतर पटाक्यांच्या गोदामाच्या मालकाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.