हैदराबाद
येथील बोल्लाराम इंडस्ट्रियल एरियातील एका स्टील कारखान्यात बुधवारी सकाळी स्फोट झाला. या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला, तर 3 जण जखमी झाले आहेत. हा स्फोट बॉयलरमध्ये झाल्याचे समजते. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. हैदराबादजवळील संगारेड्डी जिल्हय़ात बोल्लाराम औद्योगिक वसाहत असून येथे गेल्या काही वर्षांत येथे असे अनेक अपघात झाले आहेत.