कंपनीची सुमारे 100 देशांमध्ये निर्यात
नवी दिल्ली
भारतातील दिग्गज वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (मारुती सुझुकी) ने बुधवारी सांगितले की, 80 च्या दशकात वाहनांची निर्यात सुरू झाल्यापासून त्यांनी एकूण निर्यातीचा 25 लाख युनिटचा टप्पा नुकताच ओलांडला आहे.
कंपनीने 1986-87 मध्ये बांगलादेश आणि नेपाळसारख्या शेजारच्या बाजारपेठांमध्ये निर्यात करण्यास सुरुवात केली होती, परंतु सध्या आफ्रिका, लॅटिन अमेरिका, आशिया आणि पश्चिम आशियासह सुमारे 100 देशांमध्ये कंपनी वाहनांची निर्यात करत आहे.
मारुती सुझुकीने एका निवेदनात म्हटले आहे की, निर्यात केलेले 25 लाखावे वाहन मारुती सुझुकी बलेनो आहे जे गुजरातमधील मुंद्रा बंदरातून लॅटिन अमेरिकेत पाठवण्यात आले होते.
हे यश मेक इन इंडियाचे : एमडी ताकेउची
मारुती सुझुकी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिसाशी ताकेउची म्हणाले, ‘25 लाख वाहनांची निर्यात हे भारताच्या उत्पादन क्षमतेचे वैशिष्ट्या आहे. हे यश भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया या उपक्रमासाठी महत्त्वाचे ठरते आहे.
टेकुची म्हणाले की, आज मारुती सुझुकी भारतातील प्रवासी वाहनांची सर्वात मोठी निर्यातदार कंपनी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.