केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे प्रतिपादन : 30 टक्के निर्यात वाढली
नवी दिल्ली
हस्तकला वस्तुंच्या निर्यातीमध्ये गुणवत्ता, डिझाईन, ब्रँड यांना प्रोत्साहन व पॅकिंगवर लक्ष देण्याची गरज असून आगामी काळात निर्यात कशी वाढेल यावरही लक्ष द्यावे लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी केले आहे. ते एका पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात बोलत होते.
आम्हाला गुणवत्ता, डिझाइन ब्रँड प्रोत्साहन व पॅकिंग आदीवर लक्ष देण्यासोबतच या क्षेत्रातून होणाऱया लाभाचाही विचार तर्कसंगत पद्धतीने करण्याची गरज असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले.
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारतात हस्तशिल्प वस्तुंची निर्यात जवळपास 30 टक्क्यांनी वधारुन 33,000 कोटी रुपयांवर पोहोचली होती. याच दरम्यान गोयल यांनी हस्तशिल्प कारागिरांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध योजना आणल्या. याचा फायदा हा कारागिरांना झाल्याचे दिसून आले असून मंत्रालयाजवळ 30-35 लाख कारागिरांचा डाटा उपलब्ध आहे.