मंत्री पियूष गोयल यांनी व्यक्त केला अंदाज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जागतिक पातळीवर अनिश्चितता असूनही चालू आर्थिक वर्षात देशाची निर्यात ही वाजवी पातळीवर वाढण्याची शक्यता केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी व्यक्त केली आहे.
आंतरराष्ट्रीय व्यापारात जागतिक मंदीचे सावट दिसून येत आहेत यामध्ये भारत सर्व निर्यात प्रोत्साहन परिषद आणि प्रमुख निर्यातदारांशी चर्चा करुन लहान मोठय़ा घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. सध्याच्या जागतिक परिस्थितीच्या वातावरणात स्पर्धा व गुणवत्तेच्या आधारे निर्यात मूल्य कसे वाढेल यासंबंधीचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही गोयल यांनी स्पष्ट केले आहे.
सध्याच्या स्थितीत 2022 ते 2023 साठी 450 अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजे 500 अब्ज अमेरिकन डॉलर मूल्याच्या मालाची निर्यात करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. यासोबतच मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत कोणत्याही निर्यातीचे ध्येय प्राप्त केले नसून सर्व हित लक्षात घेतच हा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.
आगामी काळात काहीशी भारतीय निर्यात क्षेत्रात स्थिरता आणण्यासाठी पेट्रोलियम उत्पादन, खाद्य सुरक्षेची चिंता आहे, तसेच मागील वर्षाच्या तुलनेत चालू वर्षात निर्यात वाढीवर भर देणार असल्याचा विश्वास मंत्री गोयल यांनी व्यक्त केला आहे.