नोव्हेंबरमध्ये निर्यात 2 टक्क्यांनी घसरली
नवी दिल्ली :
चालू वर्षी नोव्हेंबरमध्ये भारताची निर्यात 2.83 टक्क्यांनी घसरून 33.90 अब्ज डॉलरची झाली आहे, जी एका वर्षापूर्वी याच महिन्यात 34.89 अब्ज डॉलर राहिली होती. शुक्रवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीत ही बाब समोर आली आहे. आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये आयातही घटून 54.48 अब्ज डॉलरची झाली, तर नोव्हेंबर 2022 मध्ये ती 56.95 अब्ज डॉलर इतकी होती. गेल्या नोव्हेंबरमध्ये देशाची व्यापार तूट 20.58 अब्ज डॉलर राहिली असल्याची माहिती आहे.