Tarun Bharat

व्यापार करारानंतर भारतातून यूएईमध्ये निर्यात वाढली

Advertisements

वाणिज्य मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली

  भारत आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांच्यातील मुक्त व्यापार करार (एफटीए) मे महिन्यात अंमलात आल्यानंतर रत्ने, दागिने, धान्ये, इलेक्ट्रिकल मशिनरी आणि इतर उत्पादनांच्या निर्यातीत चांगली वाढ झाली आहे, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीमधून समोर आली आहे.   जून-ऑगस्ट 2022 या तिमाहीत यूएईमध्ये भारताची निर्यात (पेट्रोलियम उत्पादने वगळून) 14 टक्क्यांनी वाढून 5.92 अब्ज डॉलरची झाली आहे, असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 5.17 अब्ज डॉलरची निर्यात राहिल्याची माहिती आहे. तथापि, या कालावधीत जहाजे, बोटी, फ्लोटिंग स्ट्रक्चर्स, पोशाख, फार्मास्युटिकल्स, ऍल्युमिनियम, सेंद्रिय रसायने, कार्पेट्स आणि रेशीम उत्पादने या क्षेत्रातील निर्यात वाढीमध्ये घट नोंदवली गेली.

Related Stories

ऍपल 16 ते 22 टक्के वाढीच्या दिशेने

Patil_p

जगातील सर्वात स्वस्त डाटा भारतामध्ये

Patil_p

पियाजियोने दुचाकी विक्री केंद्रे केली सुरू

Patil_p

‘ओला’च्या कारखान्याची धुरा महिलांच्या हाती

Patil_p

फ्लिपकार्ट-ऍमेझॉनचा रिपब्लिक सेल

Patil_p

भारतीय टॅलेंटचा अमेरिकेला सर्वाधिक फायदा

Patil_p
error: Content is protected !!