तरुण भारत

एप्रिलमध्ये निर्यातीत 31 टक्क्यांची वाढ

पेट्रोलियम उत्पादने, इलेक्ट्रॉनिक सामग्री अन् रसायन क्षेत्राची चांगली कामगिरी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

पेट्रोलियम उत्पादने, इलेक्ट्रॉनिक सामग्री आणि रसायन यासारख्या क्षेत्रांच्या उत्तम कामगिरीमुळे एप्रिलमध्ये भारताची निर्यात 30.7 टक्क्यांनी वाढून 40.19 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी यासंबंधी माहिती दिली आहे. संबंधित महिन्यात देशाची व्यापारी तूट वाढून 20.11 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. यादरम्यान आयातीत 30.97 टक्क्यांची भर पडत एकूण आकडा 60.3 अब्ज डॉलर्स झाला आहे. यापूर्वी एप्रिल 2021 मध्ये व्यापारी तूट 15.29 अब्ज डॉलर्स राहिली होती.

मागील आर्थिक वर्षात उच्चांकी कामगिरीनंतर एप्रिल 2022 मध्ये देखील निर्यातीत भरभक्त वाढ झाली आहे. सामग्रीची निर्यात 40 अब्ज डॉलर्सला पार करून एका नव्या उंचीवर पोहोचली असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. एप्रिलमध्ये पेट्रोलियम तसेच कच्च्या तेलाची आयात 87.54 टक्क्यांनी वाढून 20.2 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. कोळसा, कोक आणि ब्रिकेट्सची आयात वाढ होत 4.93 अब्ज डॉलर्स इतका आकडा राहिला आहे. मागील वर्षाच्या एप्रिल महिन्यात हे प्रमाण 2 अब्ज डॉलर्स इतके होते.

एप्रिल 2022 मध्ये सोन्याची आयात सुमारे 72 टक्क्यांनी कमी होत 1.72 अब्ज डॉलर्सवर आली आहे. एप्रिल 2021 मध्ये हे प्रमाण 6.23 अब्ज डॉलर्स इतके होते. इंजिनियरिंग सामग्रीची निर्यात 15.38 टक्क्यांनी वाढून 9.2 अब्ज डॉलर्सवर गेली आहे. तर पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात 113.21 टक्क्यांनी वाढून 7.73 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.

Related Stories

पाँडिचेरीत काँग्रेस सरकार अल्पमतात

Patil_p

उद्योगपतींसाठी काम करतेय सरकार!

Patil_p

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी शशी थरूर यांची निर्दोष मुक्तता

Abhijeet Shinde

महागाईप्रश्नी काँग्रेसचा सरकारवर निशाणा

Patil_p

पंतप्रधानांनी दिला ‘5 सी’चा मंत्र

Patil_p

क्षयरोगाच्या उच्चाटनात हमिरपुर जिल्हा दुसरा; तर हिमाचल प्रदेश देशात तिसऱ्या स्थानावर

Rohan_P
error: Content is protected !!