Tarun Bharat

बेळगाव-सिकंदराबाद-मनगुरु मार्गावर धावणार एक्स्प्रेस

17 जानेवारीपासून होणार सुरुवात : हैदराबादचा प्रवास होणार सोयीचा

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव-सिकंदराबाद-मनगुरु एक्स्प्रेस 17 जानेवारीपासून सुरू होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर मार्च अखेरपर्यंत धावणार असून, नागरिकांचा प्रतिसाद मिळाल्यास कायम केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे बेळगावहून हैदराबाद व सिकंदराबाद परिसरात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही एक्स्प्रेस महत्त्वाची ठरणार आहे. बेळगाव रेल्वे स्थानकावर पिटलाईनची व्यवस्था करण्यात आल्याने येथून एक्स्प्रेस सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मागील महिन्यात खासदार मंगला अंगडी यांनी रेल्वेमंत्र्यांना निवेदन देऊन बेळगाव-मंत्रालय, बेळगाव-हैदराबाद मार्गावर एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी केली होती.

लॉकडाऊनपूर्वी कोल्हापूर-हैदराबाद एक्स्प्रेस धावत होती. परंतु कोरोनामुळे बंद झालेली रेल्वे अद्याप सुरू केलेली नाही. त्यामुळे या मार्गावर बेळगावमधून एक्स्प्रेस सुरू व्हावी, यासाठी वारंवार मागणी होत होती.

बेळगावमधील अनेक नागरिक हैदराबाद, सिकंदराबाद या परिसरात नोकरी-उद्योगांसाठी ये-जा करीत असतात. हैदराबाद हे शहर आयटी हब म्हणून ओळखले जात असल्याने शेकडो बेळगावमधील इंजिनिअर तेथे कामानिमित्त स्थायिक आहेत. त्यामुळे या सर्व नागरिकांमधून बेळगाव-हैदराबाद मार्गावर एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी केली जात होती.

मंगळवार दि. 17 रोजी दुपारी 1.10 वा. बेळगावमधून निघालेली रेल्वे दुसऱ्या दिवशी पहाटे 5.25 वा. सिकंदराबाद तर दुपारी 12.50 वा. मनगुरु येथे पोहोचेल. तर दि. 18 रोजी दुपारी 3.40 वा मनगुरु येथून निघालेली एक्स्प्रेस रात्री 10.10 वा. सिकंदराबाद येथे पोहोचणार असून दुसऱ्या दिवशी दुपारी 3.55 वा. बेळगावला पोहोचणार आहे.

एक्स्प्रेसला एकूण 12 बोगी जोडणार

प्रायोगिक तत्त्वावर 17 जानेवारी ते 30 मार्च दरम्यान ही एक्स्प्रेस धावणार आहे. या एक्स्प्रेसला एकूण 12 बोगी जोडण्यात येणार आहेत. खानापूर, लोंढा, अळणावर, धारवाड, हुबळी, गदग, कोप्पळ, होसपेट, बळ्ळारी यासह इतर महत्त्वाच्या स्थानकांवर रेल्वे थांबणार आहे.

Related Stories

मंगळवारपेठचा पाणीपुरवठा अद्यापही बंदच

Amit Kulkarni

कोरोना आहेच, लस घ्या, मुलांना जपा…!

Amit Kulkarni

‘ऍक्सेस’कडे मोहन मोरे बीपीएल चषक

Amit Kulkarni

शिवबसवनगर जोतिबा देवालयात रविवारी दीपोत्सव

Omkar B

बेकिनकेरे येथील नागनाथ मंदिरात दसरा उत्सव साधेपणाने

Patil_p

आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हस्ते गर्भवतींना लस

Amit Kulkarni
error: Content is protected !!