ऑनलाईन टीम / बुलडाणा :
शिवसेनेचे बंडखोर खासदार प्रतापराव जाधव यांची बुलडाणा जिल्हासंपर्क पदावरुन हकालपट्टी करण्यात करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथून यासंदर्भात पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर दिवसेंदिवस शिंदे गटातील संख्या वाढत आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सक्रिय झाले असून, त्यांनी शिवसेनेत फेरबदल करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेतील 12 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. ज्यामध्ये बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचाही समावेश होता. त्यांच्याकडे बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुखपदाचीही जबाबदारी होती. मात्र, आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांना बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून हटविण्यात आले आहे.
तर मलकापूर व जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघासाठी नेमलेले शांताराम दाणे पाटील यांनाही जिल्हाप्रमुख पदावरून हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी वसंतराव भोजने यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा : शिंदेंचा आत्महत्यामुक्त महाराष्ट्राचा संकल्प ठरतोय फोल, 23 दिवसातच 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या