Tarun Bharat

कार्ड पेमेन्ट टोकनायझेशनचा कालावधी वाढविला

आरबीआयची नवी योजना ः 1 जुलै ऐवजी हा नियम 1 ऑक्टोबरपासून होणार लागू

नवी दिल्ली

Advertisements

 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) यांनी कार्ड पेमेन्टच्या टोकनायझेशन सिस्टमचा कालावधी हा तीन महिन्यांनी वाढविला आहे. आता ही योजना 1 जुलैऐवजी 1 ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहे.

काय आहे ‘टोकनायझेशन सिस्टम’

ही योजना लागू करण्यात आल्यानंतर ग्राहकांना कार्ड डिटेल्स कोणत्याही तिसऱया पार्टीला ऍपसोबत शेअर करता येणार नाही. तसेच काही ऑनलाईन अन्न  मागविणे किंवा कॅब बुक करत असल्यास कार्डचा तपशील देणे बंधनकारक राहणार आहे. ग्राहकांच्या कार्डची पूर्ण माहिती सेव्ह होणार आहे. ज्यामुळे अशा ऑनलाईन व्यवहारामुळे होणारा फसवणुकीचा प्रकार टाळण्यास मोठी मदत मिळणार असल्याचे संकेत आहेत. या टोकनायझेशन प्रणालीमुळे कोणतीही फसवणूक होणार नसल्याची माहिती आहे.

याचा सोप्या भाषेत अर्थ पाहिल्यास यामध्ये टोकनमध्ये ग्राहकांनी आपली कार्ड डिटेल्स देण्याची गरज नाही. याच्या जागी एक यूनिक आल्टरनेट नंबर राहणार आहे. ज्याला ‘टोकन’ असे म्हणतात. जे आपल्या कार्डसोबत लिंक राहणार आहे.  याचा वापर करुन कार्डचा तपशील हा पूर्णपणे सुरक्षित राहणार आहे.

कोणत्याही ई कॉमर्स वेबसाईट यासारख्या ऍपना पेमेन्ट करताना ग्राहकांना 16 अंकी कार्ड नंबर टाकण्याची गरज भासणार नाही. त्याच्या जागी टोकन नंबर टाकावा लागेल.

डेबिट व क्रेडिट कार्डसाठी नियम

साधारणपणे डेबिट आणि क्रेडिट या दोन्ही कार्डधारकांना ऑनलाईन पेमेन्ट करण्यासाठी प्रत्येकवेळी आपल्या कार्डचे 16 अंकी नंबर देण्याची गरज नाही. कारण अशा नियमांना आपण पुन्हा एकदा पेमेन्ट केल्यास दुसऱयांदा फक्त कार्ड व्हेरीफिकेशन व्हॅल्यू (सीव्हीव्ही) आणि वन टाईम पासवर्ड देत पेमेन्ट करता येईल.

डाटा सुरक्षित राहणार 

विविध प्रकारच्या ऑनलाईन शॉपिंगच्या वेबसाईट व ऍपच्या माध्यमातून करण्यात येणाऱया खरेदीवेळी आपल्या कार्डचा तपशील समजून त्यामधून कोणीही  फसवणूक करु नये म्हणून ही सुविधा करण्यात आली आहे. यातून डाटा चोरी व अन्य फसवणूक करणाऱया प्रकारांना आगामी काळात आळा बसणार असल्याचेही अभ्यासकांचे मत आहे.

Related Stories

शेअरबाजार आठव्या दिवशीही तेजीतच

Omkar B

जस्ट डायलचा तिमाही नफा वधारला

Patil_p

बाजारात सेन्सेक्स-निफ्टीत काहीशी घसरण

Amit Kulkarni

कृषी अन्नधान्याची निर्यात वाढली

Patil_p

LPG गॅस सिलिंडर महागला

datta jadhav

जून तिमाहीत डिपॉझिटस्मध्ये वाढ

Patil_p
error: Content is protected !!