Tarun Bharat

पीएम आवास योजनेला 2024 पर्यंत मुदतवाढ

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मागणीनुसार पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘देशातील सर्वांसाठी घर’ ही योजना 2015 मध्ये सुरू झाली होती. या अंतर्गत सर्व पात्र नागरी लाभार्थ्यांना मार्च 2022 पर्यंत पक्की घरे देण्यात आली. या योजनेला आता आणखी मुदतवाढ मिळाली आहे. या योजनेंतर्गत मार्च 2022 पर्यंत 122.69 लाख घरे पूर्ण करण्यासाठी लाभार्थींना निधी प्रदान करण्यात आला आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया करणार संयुक्त चित्रपटनिर्मिती

सरकारने भारत आणि ऑस्ट्रेलियाला एकत्र चित्रपट बनवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन्ही देशांमधील दृकश्राव्य सह-उत्पादन कराराला मंजुरी देण्यात आली. भारत-ऑस्ट्रेलियामध्ये लवकरच चित्रपटांच्या संयुक्त निर्मितीसाठी करार होणार आहे. भारताने आतापर्यंत 15 देशांशी असे करार केले आहेत. यानंतर भारतातील चित्रिकरण आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रात ऑस्ट्रेलियाचे सहकार्य वाढेल. हा करार चित्रीकरणापासून ते निर्मितीपर्यंत एकमेकांना सुविधा पुरविण्यासाठी करण्यात येणार आहे. अलीकडच्या काळात भारतीय चित्रपटांच्या शूटिंगसाठी ऑस्ट्रेलिया हे एक आदर्श ठिकाण म्हणून उदयास आले आहे.

Related Stories

कोरोना बळींच्या संख्येत भारत पाचव्या स्थानी

datta jadhav

दिल्लीत कोरोना रुग्णांनी ओलांडला 6.44 लाखांचा टप्पा

Rohan_P

उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल अझीज कुरेशींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

माजी केंद्रीय गृहमंत्री बुटा सिंग यांचे निधन

Patil_p

मरकज : इंडोनेशियातून आलेल्या धर्मगुरूंसह 12 जणांवर गुन्हा

prashant_c

राष्ट्रपती निवडणुकीत खासदारांच्या मताचे मूल्य घटणार

Patil_p
error: Content is protected !!