अंतिम मुदत सहा महिन्यांनी वाढवली : सेबीकडून परिपत्रकामधून माहिती
नवी दिल्ली
नवीन आर्थिक वर्ष सुरु होण्यापूर्वी, बाजार नियामक (सेबी) यांच्याकडून गुंतवणूकदारांसाठी एक बातमी आणली आहे. यामध्ये सेबीने डिमॅट खात्याच्या नामांकनाची अंतिम मुदत ही 6 महिन्यांनी वाढवली आहे. यासंबंधीची माहिती सेबीने आपल्या परिपत्रकामधून सादर केली आहे. यामुळे आता 30 सप्टेंबर 2023 पर्यंत डिमॅट खात्यांचे नामांकन करता येणार आहे. या अगोदर ही अंतिम मुदत 31 मार्च 2023 इतकी होती.
नामांकन न झाल्यास?
बाजार नियामक सेबीने सांगितले की, हा निर्णय भागधारकांकडून मिळालेल्या निवेदनावर आणि ट्रेडिंग व डिमॅट खात्यांच्या मूल्यांकनाच्या आधारे घेण्यात आला आहे. ज्या खात्यांमध्ये नामांकनाचे कोणतेही अपडेट नाही केले तर 30 सप्टेंबरनंतर ट्रेडिंग आणि डेबिटसाठी खाते बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
अशी राहतील टप्पे
?डिमॅट खाते नामांकनासाठी प्रथम डिमॅट खात्यात लॉग इन करावे
?यानंतर उघडलेल्या वेबपेजवर ‘माय नॉमिनीज’ या विभागात जावे
?नंतर ‘अॅड नॉमिनीज’ किंवा ‘ऑप्ट आउट ’ हा पर्याय निवडावा
आता नामनिर्देशित मुख्य तपशील भरावा व आयडी प्रूफ अपलोड करावे
?वरील टप्पे झाल्यानंतर या टप्प्यात ‘टक्केवारी’मध्ये नॉमिनीच हिस्सा टाकावा
?अंतिम टप्प्यात दस्तऐवजावर ई स्वाक्षरी करावी लागेल
?ही सर्व प्रक्रिया आधार ओटीपीच्या मदतीने पूर्ण होईल
? जवळपास प्रक्रिया 24 ते 48 तासांमध्ये पूर्ण होईल