22 सप्टेंबरपर्यंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दिलेल्या पत्त्यावर प्रवेशिका पाठवावी
प्रतिनिधी/कोल्हापूर
शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 15 नोव्हेंबर 2022 पासून हौशी राज्यनाटय़ स्पर्धा सुरू होणार आहेत. या स्पर्धेसाठी होशी नाटय संस्थांना प्रवेशिका भरण्यासाठी 22 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे, माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात आली.
61 व्या हौशी मराठी नाटय़ स्पर्धेची प्राथमिक फेरी 15 नोव्हेंबर 2022 पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर होणार आहे. तसेच 61 व्या महाराष्ट्र राज्य हौशी हिंदी संगीत संस्कृतची अंतिम फेरी 6 जानेवारी 2023 पासून प्रत्येकी एका केंद्रावर होईल. तर 19 व्या महाराष्ट्र राज्य बाल स्पर्धेची प्राथमिक फेरी 1 जानेवारी 2023 पासून 10 केंद्रांवर होणार असून दिव्यांग बाल स्पर्धेची अंतिम फेरी फेब्रुवारी 2023 मध्ये होईल. राज्य नाटय़ स्पर्धेसाठी 3 हजार अनामत रक्कमेचा धनादेश तर बाल 1 हजार रक्कमेचा धनादेश स्पर्धक संस्थेने संचालक सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या नावे पाठवावा. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनादेश (डीडी) संस्थांना परत देण्यात येईल. राज्य स्पर्धेत सहभागी नाटय़ संस्थांना विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या www.mahasanskruti.org या संकेतस्थळावर नवीन संदेश या मथळ्याखाली उपलब्ध आहे.
आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका 22 सप्टेंबरपर्यंत योग्य पत्यावर सादर करावी. मुंबई, कोकण व नाशिक विभागातील संस्थांनी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई-32 या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्या. पुणे महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, बंगला 4 विमानतळ रोड, पुणे या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्या. औरंगाबाद महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, रूम नंबर 02, एमटीडीसी बिल्डिंग, गोल्डी टॉकीजच्या समोर, स्टेशन रोड, औरंगाबाद-431005 प्रवेशिका सादर कराव्यात. नागपूर व अमरावती महसूल विभागातील संस्थानोल सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय द्वारा अभिरक्षक, मध्यवर्ती संग्रहालय अस्थायी प्रदर्शन हॉल, तळमजला, सिकिल लाईन, नागपूर 440001 या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात. विहित मुदतीनंतर प्राप्त होगा प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत स्विकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण भरला नसल्यास प्रवेशिका अपात्र ठरविण्यात येईल. प्रवेशिकेतील त्रुटींच्या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची सर्व स्पर्धक संस्थांनी नोंद घ्यावी.
स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा केली जाईल. नाटय़स्पर्धेकरीता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उलंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरेल. राज्यातील जास्तीत जास्त नाटय संस्थांनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत केले आहे.