ऑनलाईन टीम / तरुण भारत :
औरंगाबादमध्ये आयोजित एका कव्वालीच्या कार्यक्रमात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांच्यावर काही उत्साही कार्यकर्त्यांनी अक्षरक्ष: नोटांची उधळण केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
खा. जलील यांनी शुक्रवारी औरंगाबादेतील आमखास मैदानावर कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम सुरू होताच जलील यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर नोटांचा वर्षाव केला. जलील यांच्यावर नोटांची उधळण करण्याची कार्यकर्त्यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी एमआयएमचे तत्कालीन औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर साजेद यांच्या भाचीच्या लग्नात देखील नरवदेवाला भेटण्यासाठी व्यासपीठावर आलेल्या जलील यांच्यावर नोटांचा वर्षाव करण्यात आला होता. खुलताबाद येथे एका कव्वालीच्या कार्यक्रमातही जलील यांच्यावर अशाच प्रकारे पैसे उधळण्यात आले होते.
अधिक वाचा : महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टीनंतर एकदाही शेतकऱ्यांच्या बांधावर न जाणारे जलील यांच्यावर अशा प्रकारे पैसे उधळताना बघून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.