Tarun Bharat

गणेशोत्सवासाठी सुरू झाल्या जादा बस

प्रवाशांच्या सोयीसाठी विविध मार्गांवर अतिरिक्त 80 बसेस : प्रवाशांची गैरसोय होणार दूर, वेबसाईटवर तिकीट बुकिंग सुरू

प्रतिनिधी /बेळगाव

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंडळाने शुक्रवारपासून विविध मार्गांवर जादा बस सुरू केली आहे. गणेशोत्सव काळात ये-जा करणाऱया प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीखातर परिवहनने विविध मार्गांवर 80 अतिरिक्त बसेस सोडल्या आहेत. प्रवाशांची संख्या वाढल्यास पुन्हा बसफेऱया वाढविण्याचा निर्णय देखील परिवहन घेणार आहे.

कोरोनाचा प्रचंड फटका परिवहनला बसला आहे. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा कमजोर झालेल्या परिवहनला उत्पन्न मिळविणे आवश्यक आहे. दरम्यान सणासुदीच्या काळात विविध मार्गांवर जादा बसेस सोडून उत्पन्न मिळविण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. गणेशोत्सवासाठी गोवा, पुणे, मुंबई, बेंगळूर, म्हैसूर, दावणगिरी, हावेरी, चिकोडी, बागलकोट, बळ्ळारी आदी ठिकाणी जादा बसेस धावणार आहेत. त्यामुळे या जादा बसच्या माध्यमातून परिवहनला उत्पन्न प्राप्त होणार आहे.

गणेशोत्सव काळात मूळ गावी येणाऱया प्रवाशांची संख्या अधिक असते. बेंगळूर, म्हैसूर, पुणे, मुंबई आणि गोव्यातून बेळगावला येणाऱया प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे या मार्गावर परिवहनने जादा बसेस सोडल्या आहेत. गणेशोत्सवाची सुटी काहींना शनिवारपासून दिली गेली आहे. त्यामुळे परिवहनने विविध मार्गांवर शुक्रवारपासूनच जादा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

परिवहनने प्रवाशांच्या सोयीखातर ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था केली आहे. प्रवासी बसस्थानकात किंवा ksrtc.karnataka.gov.in या वेबसाईटवर तिकीट बुकिंग करून प्रवास करू शकतात. शिवाय आगाऊ बुकिंग व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रवाशांची संख्या वाढल्यास जादा बसेस सोडणार

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विविध मार्गांवर शुक्रवारपासून जादा बस सोडण्यात आल्या आहेत. शनिवारपासून प्रवाशांची संख्या वाढेल, या अपेक्षेने मुंबई, पुणे, बेंगळूर मार्गावर जादा बस धावत आहेत. प्रवाशांची संख्या वाढल्यास पुन्हा बसफेऱया वाढविल्या जातील.

– के. के. लमाणी (विभागीय संचार अधिकारी)

Related Stories

बेळगाव विमानतळाच्या रनवेची दुरुस्ती

Amit Kulkarni

भडकल गल्ली कॉर्नर येथे तुंबल्या गटारी, स्वच्छतेकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

खानापुरातील कार्यालयात निवडणुकीनंतर शुकशुकाट

Omkar B

‘तबलिग’च्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कर्नाटकातील 13 जणांना कोरोना

Patil_p

न्यायालये 31 पर्यंत राहणार बंद

Amit Kulkarni

सर्पमित्रासाठी धावून गेले फेसबुक प्रेन्ड्स सर्कल

Amit Kulkarni