Tarun Bharat

एक्स्ट्रीम स्पोर्ट्स,गोकाक क्लब पुढील फेरीत

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

युनियन जिमखाना आयोजित युजी चषक बाद पद्धतीच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून एक्स्ट्रीम स्पोर्ट्सने इलेव्हन स्टार संघाचा तर गोकाक क्रिकेट क्लब संघाने बेळगाव स्ट्रायकर संघाचा पराभव करुन पुढील फेरीत प्रवेश केला. नवीन हांचीनमनी, युसुफ अली याना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

जिमखाना मैदानावर पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एक्सट्रीम स्पोर्ट्स क्लब संघाने 20 षटकात 6 गडीबाद 270 धावा केल्या. त्यात नवीन हांचीनमनी 70, विशाल गौरगोंडाने 46, जयंत यादवने 45 धावा केल्या. इलेव्हन स्टारतर्फे साहिल नदाफ 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना इलेव्हन स्टार संघाने 20 षटकात 5 गडी बाद 125 धावाच केल्या. त्यात मुद्दसिर तहसीलदारने 69, महबूब मुल्लाने 37 धावा केल्या.

दुसऱ्या सामन्यात बेळगाव स्ट्रायकर संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 108 धावा केल्या. त्यात रवी चव्हाणने 46 तर नागेश कंग्रराळकरने 20 धावा केल्या. गोकाक संघातर्फे आनंद कुन्नूर व अनिल नाईक यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना गोकाक संघाने 10.3 षटकात 4 गडी गमावत विजयाचे उद्दिष्ट गाठले. त्यात युसुफअली वंटमोरीने 54 तर सिद्धाप्पाने 27 धावा केल्या.

Related Stories

भुवनेश्वरी उत्सव साधेपणाने

Omkar B

पंचकल्याण महामहोत्सवात एकात्मतेचे दर्शन

Amit Kulkarni

वैश्यवाणी समाजातर्फे गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार

Amit Kulkarni

परतीच्या पावसाने उडाली शेतकऱयांची झोप

Patil_p

मणप्पुरम गोल्डमध्ये चोरीचा प्रयत्न

Patil_p

बसस्थानकात प्रवाशांची गर्दी

Amit Kulkarni