बेळगाव : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीने खानापूर तालुक्यातील 32 गावे दत्तक घेतली आहेत. या उपक्रमांतर्गत या गावांतील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाते. फाऊंडेशनने समाज कल्याणासाठी पाऊल टाकत नेत्रदर्शन स्पेशालिटी आय हॉस्पिटलशी सहकार्य केले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून 27 नोव्हेंबर रोजी खानापूर तालुक्यातील ओलमणी गावात नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा गावातील सुमारे 85 रुग्णांनी लाभ घेतला. नेत्रदर्शन स्पेशालिटी आय हॉस्पिटलचे (डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलचे युनिट) कर्मचारी उदय, पीआरओ आणि कर्मचाऱ्यांनी नेत्रतपासणी केली. यासाठी लोककल्प फाऊंडेशनचे प्रसाद असुकर, संतोष कदम, अनंत गावडे यांनी परिश्रम घेतले.
Previous Articleएन्फ्लुएन्झासारख्या श्वसनाच्या आजारापासून काळजी घ्या
Next Article कर्नल अजित सिंग यांची लोकमान्य सोसायटीला सदिच्छा भेट
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.