Tarun Bharat

लोककल्प फौंडेशनतर्फे नेत्रतपासणी शिबिर

बेळगाव : लोककल्प फौंडेशनने नंदादीप नेत्र रुग्णालय बेळगावच्या संयुक्त विद्यमाने 30 नोव्हेंबर रोजी गवळीवाडा येथे नेत्रशिबिर आयोजित केले होते. शिबिरात 100 ग्रामस्थ आणि शाळकरी मुलांनी सहभाग घेतला होता.

लोकमान्य सोसायटी संचालित गाव दत्तक उपक्रमांतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नंदादीपच्या डॉक्टरांनी डोळ्यांशी संबंधित आजाराची आणि चष्म्याची तपासणी केली. आनंद तुप्पड, शिवशरण बेट्टाड, अरित्रा, मोसम, सागर गोब्बर आणि ऑप्टीशियन एम. आर. अमित कटवा उपस्थित होते. भविष्यात नेत्रदोष ऊग्णांना मोफत चष्मे वाटप केले जातील. लोककल्पचे स्वयंसेवक संतोष कदम, अनंत गावडे, प्रितेश पोतेकर यांनी कार्यक्रमाची व्यवस्था केली.

Related Stories

पिढय़ान्पिढय़ांचे चालते बोलते विद्यापीठ

Patil_p

वीरभद्रनगर येथील खांबावर दिवे बसविण्याकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

शोध मोहीम अधिक तीव्र

Rohit Salunke

अट्टल मोटार सायकल चोराला अटक

Patil_p

नव्या विद्युत मीटरची शहरात कमतरता

Amit Kulkarni

लोकमान्यतर्फे उन्नती महोत्सव 8 फेब्रुवारीला

Patil_p