प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी संचालित लोककल्प फौंडेशनतर्फे डॉ. पटवर्धन यांच्या नंदादीप नेत्र रुग्णालय बेळगाव यांच्या सहकार्याने ओलमणी (ता. खानापूर) येथे नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोकांमध्ये नेत्रचिकित्सेबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि त्यांना नेत्रसेवा प्रदान करणे, हा या नेत्रतपासणी शिबिराच्या आयोजनामागचा मुख्य उद्देश होता.
लोकमान्य सोसायटी व लोककल्प फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध दत्तक खेडय़ात नियमितपणे आरोग्य तपासणी शिबिरे, नेत्रचिकित्सा शिबिरे, व्यावसायिक मार्गदर्शन व इतर समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जातात. या शिबिराला ओलमणी येथील शेकडो रहिवासी उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी नंदादीप नेत्रालय व लोककल्प फौंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.