बेळगाव : लोककल्प फौंडेशनने नेत्रदर्शन इस्पितळाच्या डॉ. संगीता के., विशाल हेगडे, आणि उदय यांच्यासमवेत चिखले गावात नेत्रशिबिर आयोजित केले होते. सदर शिबिरात डोळ्यांचे आजार आणि मोतीबिंदूची समस्या तपासण्यात आली. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला असून सुमारे 79 लोकांनी शिबिरासाठी उपस्थित राहून लाभ घेतला. लोककल्प फौंडेशन हा लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रम नियमितरित्या कार्यरत आहे. संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपाध्यक्ष अजित गरगट्टी यांच्या नेतृत्वाखाली कणकुंबी भागातील दुर्गम 32 गावे दत्तक घेतली आहेत आणि चिखले गाव त्यापैकी एक आहे. लोकमान्य सोसायटी, लोककल्प फौंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपते व विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य सेवा सातत्याने पुरविते. लोककल्पचे स्वयंसेवक संतोष कदम, अनंत गावडे, सुहासिनी पेडणेकर, सूरजसिंग राजपूत, प्रितेश पोतेकर आणि प्रसाद आसुकर आणि इतर अनेक गावातील सदस्य शिबिराला उपस्थित होते. सेवेबद्दल ग्रामस्थांनी लोकमान्य सोसायटी, लोककल्प फौंडेशन व नेत्रदर्शन इस्पितळाचे आभार मानले.
Previous Articleबेळगाव टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोशिएशनतर्फे क्रिकेट स्पर्धा
Next Article राज्यात तुरळक पावसाचा अंदाज
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.