दुपारी 3 पासून रात्री 10 वाजेपर्यंत शहर-उपनगरांतील विविध भागात विसर्जन वाहने उपलब्ध होणार
प्रतिनिधी /बेळगाव
गणरायांचे आगमन बुधवारी मोठय़ा उत्साहाने झाले. काही भाविक दीड दिवसाच्या गणरायांची प्रति÷ापना करतात. दीड दिवसानंतर भक्तीभावाने गणरायांना निरोप देतात. त्यामुळे महापालिकेच्यावतीने दीड दिवसाच्या श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विसर्जन वाहनांची सुविधा उपलब्ध केली आहे. दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत शहर आणि उपनगरांतील विविध भागात विसर्जन वाहन उपलब्ध होणार आहे.
विहीर, नदी किंवा अन्य ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विसर्जनावर बंदी घातली आहे. पाणी दूषित होत असल्याने दीड दिवसाच्या गणरायांचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेने दोन वाहने आणि महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱयांची नियुक्ती केली आहे. यंदा गुरुवार दि. 1 रोजी दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाकरिता महापालिकेने फिरत्या वाहनांची व्यवस्था करून विसर्जनाची सुविधा उपलब्ध केली आहे. दि. 1 रोजी विविध भागात फिरते वाहन उपलब्ध राहणार असल्याने भाविकांनी याचा लाभ घेऊन श्रीमूर्ती विसर्जन करून पर्यावरणाच्या रक्षणासह आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त रुद्रेsश घाळी यांनी केले आहे. तसेच कपिलेश्वर तलाव, रामेश्वर तलाव, किल्ला येथील विसर्जन कुंड, जुने बेळगाव, कणबर्गी अशा विविध ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
मूर्ती विसर्जनासाठी उपलब्ध होणाऱया वाहनांसह अधिकाऱयांचा तपशील
विसर्जन स्थळ | वाहन क्रमांक | वाहनचालकाचा मो. क्र. | वेळ | आरोग्य निरीक्षक व दफेदार यांचे मो. क्र. |
भाग्यनगर पाचवा क्रॉस | केए-22 सी-2864 | कामण्णा 9686150060 | दु. 3 ते 4 | अनिल बोरगावी- 9632605358, रामकृष्ण ओबळेश- 8867678181 |
दुसरे रेल्वेगेट गणेश चौक टिळकवाडी | केए-22 सी-2864 | कामण्णा 9686150060 | दु. 4.30 ते 5.30 | शीतल रामतीर्थ- 7795762838, परशुराम चव्हाण- 8867359531 |
जुना पी. बी. रोड, धाकोजी हॉस्पिटलजवळ, खासबाग | केए-22 सी-2864 | कामण्णा 9686150060 | सायं. 6 ते 7 वा. | शैला कुंभार-8884868208 मलिक दोडमणी- 6362903236 |
बसवेश्वर चौक, खासबाग | केए-22 सी-2864 | कामण्णा 9686150060 | रात्री 7.30 ते 8.30 | कलावती अड्डनी- 8496044180, श्याम चौगुले- 9342721205 |
सुभाष मार्केट हिंदवाडी | केए-22 सी-2864 | कामण्णा 9686150060 | रात्री 9 ते 10 | यू. ए. गणाचारी – 9448304724, एस. डी. कळ्ळीमनी- 7026379107 |
विश्वेश्वरय्यानगर बसस्थानकाजवळ | केए-22 सी-2800 | गौस नदाफ 9611706673 | दु. 3 ते 4 | सुवर्णा पवार- 9448055669, सिद्राई चौगुले- 8540079876 |
रामलिंगखिंड गल्ली, टिळकवाडी | केए-22 सी-2800 | गौस नदाफ 9611706673 | दु. 4.30 ते 5.30 | एस. एम. कुरबेट- 9535362132, भीमा कांबळे- 9686499462, विजय जाधव-9449939005 |
स्टेट बँक ऑफ म्हैसूर, महांतेशनगर | केए-22 सी-2800 | गौस नदाफ 9611706673 | सायं. 6 ते 7 | रूक्सार मुल्ला- 9686222312, अशोक कोलकार- 9986593947 |
डॉ. न. जे. नागलोतीमठ घराजवळ, बॉक्साईट रोड | केए-22 सी-2800 | गौस नदाफ 9611706673 | रात्री. 7.30 ते 8.30 | पुंडलिक लमाणी- 9900680087, परशुराम आदीयांद्रा- 9880732888 |
हनुमाननगर चौक | केए-22 सी-2800 | गौस नदाफ 9611706673 | रात्री 9 ते 10 | एस.व्ही.कांबळे-9886431331, राजू कोला-9731003401 |