Tarun Bharat

फडणवीस-पटोले यांच्यात बंद दाराआड चर्चा, चर्चांना उधाण

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

उपमुख्यमंत्री आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी काल भंडारा जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. या बैठकीनंतर फडणवीस आणि नाना पटोले (Nana Patole) यांची नियोजन अधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप समोर आले नाही. मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच भंडारा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आले होते. या बैठकीला नाना पटोले काहीसे उशिरा पोहोचले. बैठकीमध्ये त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. त्याला अधिकारी आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तरं दिली. साधारण दीड ते पावणेदोन तास चाललेल्या या बैठकीनंतर फडणवीस पत्रकार परिषद घेणार होते. मात्र, बैठकीनंतर पत्रकार परिषदेदरम्यानच्या काही मिनिटांच्या काळात फडणवीस आणि पटोले यांच्यात नियोजन अधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी पदाधिकारी आणि सुरक्षा रक्षकांनाही बाहेर ठेवण्यात आले होते. अवघ्या पाच ते सात मिनिटांची ही भेट होती. भेटीमागचा उद्देश समोर आला नाही. मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.

अधिक वाचा : दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर ताकद दाखवू, डॉ. नीलम गोऱ्हे यांचा निर्धार

दरम्यान, या भेटीनंतर फडणवीस पत्रकार परिषदेसाठी पोहचले. भंडारा जिल्ह्यातील स्थानिक प्रश्नांवर ही भेट झाल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.

Related Stories

एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय वाहतूकीमध्ये आपला दर्जा गमावला

Archana Banage

सातारा: १५० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर ४ जणांचे नमुने पाठविले तपासणीला

Archana Banage

साखरपुड्यासाठी निघालेली बस 50 प्रवाशांसह 100 फूट दरीत कोसळली

datta jadhav

खैरेंना काहीही माहित नसतं; ते ढगात गोळ्या मारतात

datta jadhav

तिरुपती-कोल्हापूर विशेष एक्सप्रेस रद्द

Archana Banage

उपरी येथे ट्रॅक्टरच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

Archana Banage
error: Content is protected !!