Tarun Bharat

फडणवीसांचा दावा धादांत खोटा…उपमुख्यमंत्र्यांना खोटे बोलणे शोभत नाही- अजित पवार

Ajit Pawar : शासकिय नोकरदारांचे पगार कर्नाटक बँकेत (Karnatak Bank) जमा करण्याचा निर्णय हा महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या काळात घेतला गेला असल्याच्या आरोपाचे खंडन करताना तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील अर्थमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेत अजित पवार (Aji Pawar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) खोटे बोलत असल्याचा आरोप केला. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका करताना म्हणाले, ” शासकिय नोकरदरांचे पगार करण्यासाठी अनेक प्रस्तव आले होते. त्यामध्ये कर्नाटक बँकेचाही समावेश होता. पण ही बँक शासनाच्या नियमात बसत नसल्याने त्या बँकेचा प्रस्ताव आम्ही फेटाळला. देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप हे धादांत खोटे आहेत. त्यावेऴच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत अणि मी स्वत: त्यावेळचा अर्थमंत्री म्हणून सांगतो कि, कर्नाटक बँकेत पगार करण्याचा प्रस्ताव 7 डिसेंबरला मंजूर झाला आहे. हा शासकिय आदेश एका दिवसात मंजूर झाला असून कर्नाटक सातत्याने अत्याचार करत असूनही अशाप्रकारे तुम्ही त्यांना प्रोत्साहन देत आहात. राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणविस यांनी असे खोटे बोलणे त्यांना अजिबात शोभत नाही.” अशी टिका अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली. यावेळी त्यांनी पुरावा म्हणून तत्कालीन कागदपत्रे ही दाखवली.

Related Stories

अतिक्रमण न काढल्याच्या निषेधार्थ शनिवारी जलसमाधी आंदोलनाचा इशारा

Archana Banage

बार्शीतील खांडवीत टिप्परच्या जॅक मध्ये अडकून चालक ठार

Archana Banage

मास्क विक्रीत कोल्हापूर टॉप-2

Archana Banage

जिल्ह्यात एकूण २८६ पॉझिटिव्ह, शाहूवाडी सर्वाधिक ९५

Archana Banage

26 जानेवारीपासून सर्व शाळांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन

prashant_c

सीमाप्रश्न अचानक वरती कसा आला?

Abhijeet Khandekar