तासभराच्या प्रतीक्षेनंतर वीजपुरवठा सुरळीत
बेळगाव : रेल्वेस्टेशन येथील हेस्कॉम विद्युत उपकेंद्रात सोमवारी सायंकाळी अचानक बिघाड झाल्यामुळे शहर तसेच उपनगरात तासभर विजेचा खेळखंडोबा झाला. सायंकाळच्या सुमारास वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाला. शहापूर, टिळकवाडी, अनगोळ या परिसरात वीजपुरवठा ठप्प झाला होता. रेल्वे स्टेशन येथील उपकेंद्रात झालेल्या बिघाडामुळे तासभर वीजपुरवठा खंडित करण्यात आला. कोणतीही पूर्वसूचना न देताच वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने नागरिकांमधून फोन करून विचारणा केली जात होती. तासभरानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.