सेन्सेक्स-निफ्टीचे निर्देशांक घसरणीसह बंद, विप्रो तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात अखेरच्या सत्रात शुक्रवारी निराशा दिसून आली. प्रारंभीच्या दरम्यान बाजारात चढउताराची स्थिती राहिली होती, मात्र यानंतर काही वेळानंतर प्रमुख समभागांत विक्रीचा दबाव राहिल्याने सेन्सेक्सचा निर्देशांक 49 अंकांनी पडझडीत राहिला. यामुळे भारतीय बाजारात गुंतवणूकदारांमध्ये नाराजीचा सूर राहिला होता.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स जास्तीत जास्त कालावधीत लाभात राहिला होता, परंतु बाजार बंद होण्याच्या अगोदर काहीवेळ विक्रीमुळे सेन्सेक्स दिवसअखेर 48.88 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 55,769.23 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 43.70 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 16,584.30 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांपैकी सेन्सेक्समधील अल्ट्राटेक सिमेंट, मारुती सुझुकी, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, ऍक्सिस बँक आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्रा यांचे समभाग प्रामुख्याने नुकसानीत राहिले होते. याच्या विरुद्ध बाजूला रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, लार्सन ऍण्ड टुब्रो, एचसीएल टेक, सन फार्मा, विप्रो, टीसीएस आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत.
जागतिक स्थितीमध्ये आशियातील अन्य बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कॉस्पी आणि जपानचा निक्की लाभात राहिले आहेत. चीनचा बाजार बंद होता. युरोपीय बाजार काहीप्रमाणात तेजीचा कल होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.66 टक्क्यांनी घटून 116.8 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी जवळपास 451.82 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे.
आगामी काळात भांडवली बाजारात तेजी कायम राहणार का नाही याबाबत आताच अंदाज बांधणे चुकीचे ठरेल. कारण येत्या काळात आरबीआय पतधोरण बैठक घेत पुन्हा रेपोदरात वाढ करण्याचे संकेत आहेत.