प्रतिनिधी / बेळगाव : जिल्ह्याचे पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या नावे इंस्टाग्रामवर बनावट खाते उघडण्यात आले आहे. या माध्यमातून लोकांकडे पैशांची मागणी करण्यात आली आहे.
मी कोणतेही खाते उघडलेले नसून माझा फोटो व नाव वापरून बनावट खाते तयार करण्यात आले आहे. कोणीही पैशांचे व्यवहार करू नये. असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी केले आहे.