फळ विक्रेत्या महिलेला घातला गंडा
प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडे बाजारात बऱयाच वेळा बनावट नोटा संबंधित व्यापाऱयांना गंडा पडलेला आहे. याची दखल संबंधित खात्याने घेतलेली नसून आज पर्यंत कडक तपासही करण्यात न आल्याने लोकात नाराजी होतीच. त्यात परत एकदा कुडचडेत नकली नोटांचा बाजार सुरु झाल्याचे उजेडात आले आहे. बनावट नोटा वापर पुन्हा सुरू झाल्याने या ठिकाणी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
रस्त्याच्या बाजूने बसणाऱया फळ विपेत्या महिलेला सद्या पाचशे रुपयांचा गंडा पडलेला आहे व अशा प्रकारे किती जणांना पडलेला आहे याची कोणतीच माहिती हाती आलेली नाही. ही घटना रविवारी रात्रीच्या वेळेस घडललेली आहे. 500 रूपयांची बनावट नोट फळ विक्रेत्या महिलेला एका जोडप्याने दिली. जोडप्यातील महिलेने तोंडाला कपडा बांधला होता व दुचाकी चालकाने हेल्मेट घातले होते. त्यामुळे त्यांना ओळखू शकली नाही अशी माहिती सदर फळ विपेत्या महिलेने पत्रकारांना दिली.
या घटनेनंतर कुडचडेतील व्यापारी सतर्क झाले असून सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे व प्रत्येक जण पाचशे रुपयाच्या नोटांना संशयित नजरेने बघू लागले आहे. त्यामुळे बाजारात ग्राहकांना बऱयाच अडचणीना सामोरे जावे लागत आहे. अशा स्थितीत प्रशासन व लोक प्रतिनिधी यावर पाऊल उचलेल का ? तसेच अशा घटना कुडचडे बाजारात होत राहणार की काय ? या प्रश्नावर जोरदार चर्चा होताना दिसू लागली आहे.