नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्ली पोलिसांच्या आयजीआय युनिटने सर्वात मोठय़ा आंतरराष्ट्रीय बनावट पासपोर्ट/व्हिसा रॅकेटचा पर्दाफाश केला. या पथकाने मास्टरमाईंड झाकीरसह 5 जणांना अटक केली आहे. या कारवाईत 325 बनावट पासपोर्ट, 175 बनावट व्हिसा आणि इतर संबंधित गोष्टी जप्त करण्यात आल्याची माहिती डीसीपी (आयजीआय विमानतळ) तनु शर्मा यांनी दिली. आतापर्यंत दिल्लीत पासपोर्ट-व्हिसासंबंधी करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा पोलीस अधिकाऱयांनी केला आहे. आतापर्यंतचे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय बनावट पासपोर्ट आणि व्हिसा रॅकेट असल्याचे सांगत आहेत.