Tarun Bharat

ऐंशी लाखांच्या खंडणीसाठी गोळीबाराचा बनाव

पुणे / वार्ताहर :

गोळीबार झाल्याचा खोटा बनाव करून सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाला खंडणीच्या गुन्ह्यात अडकविण्याचा डाव आखणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने पर्दाफाश केला. याप्रकरणी चार जणांवर कोंढवा पोलीस ठाण्यात 80 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी व बनावट कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असीफ ईस्माईल खान (33, कोनार्क पुरम सोसायटी, कोंढवा खुर्द, पुणे ), फर्याज पठाण, समीर मेहबुब शेख, शहाबाद मेहबुब खान यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतोष थोरात या सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाने फिर्याद दिली आहे.

अधिक वाचा : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञाताने आमच्यावर गोळीबार केल्याचा बनाव असीफ खान आणि त्याच्या साथीदारांनी व्यक्त केला होता. त्यामध्ये पोलिसांनी असीफ याला चौकशीसाठी बोलविल्यानंतर त्याने फिर्यादी संतोष थोरात याच्यावर संशय व्यक्त केला होता. याच फायरिंगच्या अनुषंगाने युनिट 5 चे अधिकारी कोंढवा पोलिस ठाण्याबरोबर गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज व तांत्रिक तपास केल्यानंतर असीफ व त्याला दुजोरा देणाऱ्या त्याच्या साथीदारांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी हा बनाव केल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी हा प्रकार संतोष थोरात यांच्याकडे खंडणी 80 लाखांची उकळण्यासाठी व त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, त्यांनी फिर्यादी यांच्याकडून यापूर्वी 6 लाखांची खंडणी उकळल्याचे समोर आले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Stories

अनिल देशमुख ईडी कार्यालयात चौकशीसाठी राहणार हजर

Archana Banage

कोल्हापूर : बंगला नावावर करत नसल्याच्या रागातून पत्नीने पतीच्या करंगळीचा घेतला चावा

Archana Banage

पुणे विभागातील 5.79 लाखांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

मंत्री छगन भुजबळांचे गणरायाला साकडे, म्हणाले…

Archana Banage

पंतप्रधानांना मुंबईबाबत विशेष आपुलकी- मुख्यमंत्री शिंदे

Abhijeet Khandekar

Kolhapur : शेत मजूर महिलेचा गळा चिरून खून; मौजे वडगाव येथील घटना

Abhijeet Khandekar