प्रतिनिधी /पेडणे
पेडणेत तालुक्मयात पडलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्मयात विविध भागात पाणी भरले असून अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. काही भागात वीज वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने अग्निशामक दलाचे अधिकारी व जवान बंब घेऊन भर पावसात कर्तव्य बजावत झाडे हटविली.
रात्री, मधलामाज मांदे येथे देवेंद्र प्रभू यांच्या बेकरीवर आंब्याचे झाड पडल्याने पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले. तर अग्निशामक दलाच्या जवानांनी बेकरीचे एक लाखांहून जास्त मालमत्ता वाचवली. मोरजी येथे रस्त्यावर जंगली झाड पडले तेथे जवानांनी धाव घेऊन रास्ता मोकळा केला. अमेरे पोरस्कडे येथे काजूचे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक बंद झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तेथे धाव घेऊन रास्ता वाहतुकीसाठी झाड कापून मोकळा केला.
वजरी हिरा फार्म जवळ रस्त्यावर झाड पडल्याने, अग्निशामक दलाच्या जवानांनी तेथे धाव घेऊन रास्ता मोकळा केला. या संपूर्ण मोहिमेत अग्निशामक दलाचे साहाय्यक अधिकारी प्रशांत धारगळकर, हवालदार, चालक विठ्ठल परब, चालक आल्वारीस मास्करेन्हस, जवान राजेश परब, विकास चव्हाण, आशीर्वाद गाड, सहदेव चोडणकर, यशवंत नाईक, सहदेव परब आदींनी पावसाची तमा न बाळगता विविध ठिकाणी पडलेली झाडे कापून बाजूला केली.