Tarun Bharat

हलकर्णी फाट्यावर दौलत कामगारांची सहकुटुंब निदर्शने

महिलांचा अथर्व कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा : भर पावसातील आंदोलनाने वेधले लक्ष

कार्वे/ प्रतिनिधी

हलकर्णी फाट्यावर दौलतच्या कामगारांनी आज सहकुटुंब निदर्शने करून पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. बेमुदत संपाच्या २३ व्या दिवशी कामगार कुटुंबियांसमवेत हलकर्णी फाट्यावर जमा झाले. अथर्व प्रशासन कामगारांच्या सोबत चर्चेस तयार नसल्याने त्यांचा निषेध करण्यासाठी हलकर्णी फाटा येथे जोरदार निदर्शने केली. ‘मानसिंग खोराटे होश मे आवो- होश में आकर बात करो, बात तो तुमको करनी होगी – करनी होगी-करनी होगी’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

यावेळी  युनियनचे अध्यक्ष कॉ. प्रा. सुभाष जाधव यांनी ‘औद्योगिक न्यायालयात युनियनबरोबर चर्चा करतो असे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले चेअरमन खोराटे, चर्चा करत नसल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला. सिटू युनियन बरोबर चर्चा टाळून कमगारांचा संप लांबवत असलेल्या चेअरमन खोराटे यांनी चर्चा करून कामगाराच्या न्याय मागण्या मंजूर कराव्यात. याशिवाय दुसरा मार्ग त्यांच्यासमोर नसल्याचे सांगितले, त्रिस्तरीय करारानुसार वेतन आणि सर्व सेवासुविधा लागू करण्याबाबत  जिल्हाधिकारी, प्रादेशिक साखर सहसंचालक,सहा. कामगार आयुक्त या सर्वांचे निर्देश अथर्व चे चेअरमन मानायला तयार नाहीत. २५% वेतन वाढीची फसवी घोषणा करून सर्वांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

उपस्थित महिलांच्यावतीने आपले मनोगत मांडताना जयश्री हारकारे यांनी गेली तीन वर्षे तुटपुज्या पगारात आम्ही आमचे कुटुंब कसे चालवित आहोत. यांचा चेअरमन खोराटे यांनी विचार केला पाहिजेत. या पगारात घर, मुलं, शिक्षण, वृद्ध माणसांचे आजार हे पाहताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आम्ही तीन वर्षे निमूटपणे संसार चालवायचा प्रयत्न केला. कामगारांनी संप केल्यानंतरही ते बोलायला तयार नाहीत. म्हणून आज आम्ही सर्व महिला आंदोलनात सहभागी झालो आहोत. आजची आमची विनंती खोराटे यांनी मानली नाही तर चार दिवसात ६०० कामगार कुटुंबातील सर्व महिल-मुले एकत्र येऊन अथर्व प्रशासनाच्या कोल्हापूर येतील कार्यालयावर धडक देऊ असा इशारा दिला.

यावेळी सिटुचे खजिनदार प्रा. आबासाहेब चौगले, जनरल सेक्रेटरी प्रदीप पवार, अनिल होडगे, हणमंत पाटील, गणेश फाटक यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात मोठ्या संख्येने कामगार-महिला सहभागी झाल्या होत्या.. भरपावसात जोरदार घोषणाबाजी करून चाललेल्या या आंदोलनाने चंदगड वासियांचे लक्ष वेधून घेतले होते. 

Related Stories

सांगरूळचा ऋतुराज नाळे गेट परीक्षा मेकॅनिकल सायन्समध्ये देशात दहावा

Archana Banage

कोल्हापूर : खामकरवाडी प्रकल्प ओसंडू लागला

Archana Banage

किरीट सोमय्या यांचे दापोली पोलिस स्थानकात आंदोलन

Abhijeet Khandekar

जिह्यातील 280 एकल कलाकारांचे मानधन जमा

Kalyani Amanagi

इचलकरंजीत तीन पानी जुगार क्लबवर छापा; १२ जणांना अटक

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात रात्री आठ पर्यंत 208 रुग्णांची भर, ८ मृत्यू

Archana Banage