‘फ्रीडम ऍट मिडनाइट’चे लेखक
वृत्तसंस्था/ पॅरिस
प्रसिद्ध फ्रेंच लेखक डॉमिनिक लॅपियर यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले आहे. भारताचे स्वातंत्र्य आणि फाळणीवर आधारित ‘फ्रीडम ऍट मिडनाटइ’ या पुस्तकाचे ते लेखक होते. या पुस्तकाने जगभरात प्रसिद्धी मिळविली होती. हे पुस्तक भारताचे स्वातंत्र्य आणि फाळणीचा इतिहास मांडणाऱया वास्तवदर्शी पुस्तकांपैकी एक मानले जाते. याची पहिली आवृत्ती 1975 मध्ये प्रकाशित झाली होती. 30 जुलै 1931 रोजी चेटेलिलोनमध्ये जन्मलेल्या लॅपियर यांनी अमेरिकन लेखक लॅरी कॉलिन्स यांच्या सहकार्याने लिहिलेल्यला 6 पुसतकांच्या सुमारे 5 कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत. यात सर्वात प्रसिद्ध पुस्तक ‘इज पॅरिस बर्निंग’ ठरले आहे. तर ‘सिटी ऑफ जॉय’ या त्यांच्या कादंबरीवर 1992 मध्ये एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. या पुस्तकाची रॉयल्टी म्हणून प्राप्त रक्कम त्यांनी भारताच्या एका प्रकल्पासाठी दान केली होती. लॅपियर यांना 2008 मध्ये पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले होते.