Tarun Bharat

आज बाप्पांना निरोप

प्रतिनिधी /बेळगाव

तब्बल दोन वर्षांनंतर मोठय़ा उत्साहात गणेशाचे आगमन झाले. बघताबघता आता बाप्पांना निरोप देण्याची वेळ आली. शुक्रवारी बाप्पांना निरोप देण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. घरोघरी आणि सार्वजनिक पातळीवर दाखल झालेले आणि भाविकांच्या भक्तिभावाचा अनुभव घेतलेले गणपती बाप्पा शुक्रवारी आपल्या गावाला परत जाणार आहेत. आपल्या लाडक्मया बाप्पांच्या विसर्जनासाठी म्हणजेच निरोपाच्या सोहळय़ासाठी बेळगावकर सज्ज झाले आहेत. विधायक गणेशोत्सवाची परंपरा जपणाऱया बेळगावात पारंपरिक वाद्यांचा गजर, फटाक्मयांचा कमीतकमी वापर आणि वेळेत विसर्जन करून बाप्पांबद्दलचा आदर राखला जाणार आहे.

कपिलेश्वर तलाव आणि रामेश्वरतीर्थ जक्कीनहोंडा तलाव येथे श्रीमूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली

असून दुपारी चार वाजता प्रशासकीय अधिकारी आणि महामंडळाचे अधिकारी यांच्या हस्ते मिरवणुकीचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर विविध मंडळे आपल्या श्रीमूर्ती आणून मिरवणुकीत सहभागी होणार आहे. बेळगावचे श्रीमूर्ती विसर्जन मिरवणूक अत्यंत वैशिष्टय़पूर्ण आहे. मध्यवर्ती भागातील सार्वजनिक उत्सव मंडळे मिरवणुकीत सहभागी होऊन कपिलेश्वर तलावामध्ये श्रीमूर्तींचे विसर्जन करतील तर अनगोळ, वडगाव, शहापूर येथील मंडळे प्रामुख्याने जक्कीन होंडा येथे तसेच कपिलेश्वर तलावामध्येही श्रीमूतींचे विसर्जन करतील. उपनगरातील मूर्तींचे विसर्जन सुलभ व्हावे यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने फिरत्या वाहनांची सोय केली आहे.

हुतात्मा चौकामध्ये दुपारी चार वाजता मिरवणुकीला सुरुवात

येथील हुतात्मा चौकामध्ये दुपारी चार वाजता मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.  पुणे-मुंबईनंतर लोकप्रिय असलेल्या बेळगावच्या गणेशोत्सवातील ऐतिहासिक  विसर्जन मिरवणूक शुक्रवारी निघणार आहे. सुबक मूर्ती, विविध मंडळांचे आकर्षक देखावे, वाद्यांचा गजर आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके यामुळे ही मिरवणूक लक्षणीय ठरणार आहे. गेले 9 दिवस गणेश भक्तीत तल्लीन झालेले भाविक यंदा दहाव्या दिवशी भक्तिभावाने गणपती बाप्पांना निरोप देणार आहेत.

बेळगावच्या विसर्जन मिरवणुकीला आगळे महत्त्व आहे. ही मिरवणूक पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांबरोबरच आसपासच्या ग्रामीण भागातील गणेशभक्त एकच गर्दी करतात. तसेच पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातील भाविकांची संख्या मोठी असते. वाजतगाजत होणारे बाप्पांचे विसर्जन पाहण्याचा आनंद अवर्णनीय असाच असतो. यामुळे दरवर्षी भाविकांची संख्या वाढतच चालली आहे. भाविकांची संख्या जितकी मोठी तितकाच गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढतो. यामुळेच विसर्जन मिरवणुकीचे वैभव वाढत चालले आहे. यावषीही शहरातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी आकर्षक देखावे सादर केले होते. ती पाहण्यासाठीही गुरुवारी उशिरापर्यंत शहरातील रस्त्यांवर गर्दी झाली होती.

ढोल-ताशांच्या गजरात श्री विसर्जन

मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणेशोत्सव  साध्यापद्धतीने साजरा करण्यात आला. मात्र यावषी कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे बाप्पांना निरोप देण्यासाठी बेळगावकर सज्ज झाले आहेत. बेळगावच्या गणेशभक्तांनी मागील चार ते पाच पारंपरिक वाद्यांवर भर दिला आहे. ढोल-ताशांच्या गजरात श्री विसर्जन करण्याची विधायकता जपली जात आहे. याचबरोबरीने गणेशासमोर विविध मर्दानी खेळ सादर करण्याची परंपरा वाढीस लागत आहे. महाराष्ट्र आणि आसपासच्या परिसरातून दाखल होणारे लेझीम व इतर वाद्यांचे मेळे मिरवणुकीचे लक्ष वेधून घेत असतात. यंदाही विसर्जनाची मिरवणूक विविध आकर्षक आणि चित्तथरारक मर्दानी खेळांनी वैशिष्टय़ पूर्ण ठरणार आहे. अनेक मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करुन विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

धक्काबुक्की नको

विसर्जनाचा सोहळा पाहण्यासाठी गर्दी झाल्यानंतर काही मंडळींकडून अकारण गर्दी वाढवून धक्काबुक्की सारखे प्रकार केले जातात. बाप्पाच्या विसर्जनाच्या सोहळय़ावर याचा परिणाम जाणवतो. यासाठी कोणतेही अनुचित प्रकार होवू नयेत, याची दखल प्रत्येक मंडळाने व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे गणरायांना निरोप देताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

निर्विघ्न मिरवणुकीसाठी पोलिसांचे पथसंचलन

श्री विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून पथसंचलन केले. मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुरुवारी बंदोबस्तावरील पोलिसांना वरि÷ अधिकाऱयांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातही पथसंचलन करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, उपायुक्त रविंद्र गडादी, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्यासह शहरातील बहुतेक अधिकारी पथसंचलनात सहभागी होते. बंदोबस्तासाठी परजिल्हय़ांतून आलेले पोलीस व अधिकारी, जलद कृती दलाचे जवान यांच्यासह तब्बल साडेतीन हजारांचे पोलीस बळ तैनात असणार आहे.

मिरवणूक बंदोबस्तासाठी सात पोलीस प्रमुख, 28 पोलीस उपअधीक्षक, 68 पोलीस निरीक्षक, 104 पोलीस उपनिरीक्षक, 164 साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, राज्य राखीव दलाच्या 10 व सीएआरच्या 7 तुकडय़ा तैनात असणार आहेत. 20 ड्रोन कॅमेरे व 700 सीसीटीव्ही कॅमेऱयांची शहरातील घडामोडींवर नजर असणार आहे.

वॉटरजेड वाहन, वज्र वाहन तैनात ठेवण्यात येणार असून प्रमुख ठिकाणी 100 स्कायसेंट्री असणार आहेत. 15 वॉचटॉवरवरून पोलीस मिरवणुकीवर लक्ष ठेवणार आहेत. गुरुवारी पोलीस परेड ग्राऊंडवर बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना वरि÷ अधिकाऱयांनी मार्गदर्शन केले.

Related Stories

मोटारसायकली चोरणाऱया युवकाला अटक

Amit Kulkarni

श्रावण शुक्रवारनिमित्त मंदिरांमध्ये महिलांची गर्दी

Amit Kulkarni

वाहतूक पोलीस हवालदाराचा हृदयाघाताने मृत्यू

Patil_p

मानस अकादमी डेव्हलपमेंट फौंडेशन चषकाचा मानकरी

Amit Kulkarni

सीमा प्रश्नाबाबतच्या समितीत अप्पर पोलीस महासंचालक, कोल्हापूरचे आय जी, कोल्हापूरचे एसपी, सांगली एस पी यांचा समावेश

Rohit Salunke

सिद्धलिंगय्या महास्वामीजींचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम

Amit Kulkarni