Tarun Bharat

आरपीडी-बीबीएच्या अंतिम वर्ष विद्यार्थ्यांना निरोप

प्रतिनिधी / बेळगाव

एसकेई सोसायटी संचालित राणी पार्वतीदेवी महाविद्यालय बीबीए विभागातर्फे  अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण व निरोप समारंभ नुकताच पार पडला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रोहितराज तसेच बीबीए, बीसीए शासन समितीच्या उपाध्यक्षा माधुरी शानभाग, प्राचार्या डॉ. अनुजा नाईक, आयक्मयूएसी समन्वयक डॉ. अभय एम. पाटील, डॉ. रामकृष्ण एन. उपस्थित होते.

यावेळी डॉ. रोहितराज म्हणाले, विद्यार्थ्यांनी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करावा, आपले कौशल्य वाढवून व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा, शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर व्यावसायिक आयुष्यामध्ये व्यक्तिमत्त्व विकासाचा सर्वाधिक फायदा होतो, असे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात माधुरी शानभाग म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात मिळालेल्या संधीचा सदुपयोग करून घ्यावा, तरुणांनी आपले कौशल्य पणाला लावले पाहिजे, असे सांगितले.

यावेळी विनीता जोशी, सौरभ उंडाळे यांना अनुक्रमे उत्कृष्ट विद्यार्थिनी व उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून गौरविण्यात आले. विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. पाहुण्यांचा परिचय समृद्धी, वंदना गुडी, चिन्मय शिंदे यांनी करून दिला. सूत्रसंचालन अर्चिता कार्लेकर यांनी केले. अचल लोहार हिने आभार मानले.

Related Stories

… एका वृद्धेची सेंच्युरी अशीही !

Amit Kulkarni

निपाणी आगाराची आंतरराज्य बससेवा बंद

Patil_p

रंगोली संगीत परिवारच्या फेसबुक पेजवर अकॅडमी ऑफ म्युझिकच्या शिष्य-गुरुंचा कार्यक्रम

tarunbharat

बेळगावच्या वैभवात भर घालणारी नवी सिल्क शोरुम ‘राजगणपती सिल्क’

Patil_p

वाऱ्या पावसामुळे भात-ऊस पीक जमीनदोस्त

Patil_p

हिंडलगा महालक्ष्मी यात्रेची उत्साहात सांगता

Patil_p
error: Content is protected !!