शाहिद अन् विजय सेतुपतिची वेबसीरिज
शाहिद कपूरचे ओटीटीवर पदार्पण लवकरच होणार आहे. त्याची पहिली वेबसीरिज ‘फर्जी’च्या प्रदर्शनाची तारीख अमेझॉन प्राइम व्हिडिओने जाहीर केली आहे. राज अँड डीकेकडून निर्मित या डार्क क्राइम कॉमेडी सीरिजमध्sय शाहिदसोबत विजय सेतुपति मुख्य भूमिका साकारत आहे. या दोन्ही दिग्गज कलाकारांचे पोस्टर जारी करण्यात आले आहे.
द फॅमिली मॅन 2 नंतर दिग्दर्शक राज अँड डीके हे फर्जीसोबत ओटीटीवर परतणार आहेत. या सीरिजमध्ये के.के. मेनन, अमोल पालेकर यासारख्या दमदार कलाकारांसह राशि खन्ना, रेजिना केसेंड्रा आणि भुवन अरोरा दिसून येणार आहे. फर्जी ही सीरिज 10 फेब्रुवारीपासून स्ट्रीम केली जाणार आहे. एकूण 8 एपिसोड्समध्ये फैलावलेली ही एक कॉन स्टोरी आहे.
‘फर्जी’ची कहाणी एका अंडरडॉग स्ट्रीट आर्टिस्टच्या अवतीभोवती घुटमळणारी आहे. सीरिजची कहाणी राज अँड डीके यांच्यासह सीता आर. मेनन तसेच सुमन कुमार यांनी लिहिली आहे. चालू वर्षी ओटीटीवर पदार्पण करणारा शाहिद पहिला बॉलिवूड कलाकार ठरणार आहे. शाहिदसोबत विजय सेतुपतिच्या अभिनयाची जुगलबंदी या सीरिजमध्ये पहायला मिळणार आहे. शाहिद याचबरोबर ‘ब्लडी डॅडी’ आणि एका रोमँटिक चित्रपटाचे चित्रिकरण करत आहे.