Tarun Bharat

धुळे दौऱ्यात दादा भुसेंचा शेतकऱ्यांकडून निषेध; काळे झेंडे दाखवत ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना आज धुळे दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांनी भुसेंना काळे झेंडे दाखवत ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा देत त्यांचा निषेध केला.

दादा भुसे आज धुळे दौऱ्यावर होते. साक्री तालुक्यातील कासारे येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी आले असता शेतकरी आक्रमक झाले होते. कासारे येथे विकासकामांचे भूमिपूजन सुरू असतानाच उपस्थित शेतकऱ्यांनी ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा देत काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला. शेतकऱ्यांच्या विरोधादरम्यान मंत्री भुसे यांनी काळे झेंडे दाखवणाऱ्या शेतकऱ्यांना समजूत घालण्यासाठी जवळ बोलावले. मात्र, शेतकरी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी दादा भुसे यांना कोणताच प्रतिसाद दिला नाही. शेतकऱ्यांनी भुसेंना डावलत कांदा प्रश्नांकडे गांभीर्याने बघण्याचे सुचविले.

अधिक वाचा :मग आम्ही तुम्हाला पेंग्विन सेना म्हणायचं का? आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना सवाल

यावेळी उपस्थित पोलिसांनी आंदोलकांना बाजूला हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडत दादा भुसे यांना दखल घेण्यास भाग पाडले.

Related Stories

साताऱ्यात आणखी 19 कोरोना पॉझिटिव्ह, आज 47 रुग्णांची भर

Archana Banage

शिवसेनाप्रमुख देशाचे मार्गदर्शक

Archana Banage

अधिवेशनात घुमला पडळकरांचा ढोल

Archana Banage

सोनाराला मागितली 20 लाखांची खंडणी

Patil_p

मुलीवर अत्याचार प्रकरणी एकाला दहा वर्षे सक्तमजुरी

Patil_p

कुंभोजमध्ये आजपासून लॉकडाऊन

Archana Banage