श्रीनगर
ः जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला हे दुसऱयांदा कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. गेल्यावषी एप्रिलमध्ये त्यांचा अहवाल पहिल्यांदा पॉझिटिव्ह आला होता. यादरम्यान त्यांना काही दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांना विलगीकरणात ठेवून आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 85 वषीय अब्दुल्ला सध्या घरात सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत.
देशात सध्या कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असून यापूर्वी कोविडच्या विळख्यात अडकलेल्यांनाही संसर्गबाधा होत असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही दुसऱयांदा कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.