बीजिंग : चीनमध्ये मंगळवारी एक भीषण दुर्घटना घडली आहे. पूर्व चीनच्या शांदोंग प्रांतात एका शाळेबाहेर विद्यार्थ्यांच्या घोळक्यात एक बस शिरल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांना घरी पोहोचविण्यासाठी नियुक्त केलेल्या बसवरील नियंत्रण चालकाने गमाविले आणि ताइयान शहरात पायी चालणाऱ्या विद्यार्थ्यांना या बसने टक्कर मारल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 13 जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. तर इतरांची प्रकृती स्थिर आहे. बसचालकाला ताब्यात घेत दुर्घटनांच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे.
Previous Articleनंदगड-हलशी रस्त्याशेजारील नाल्याचे पाणी दूषित
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.