बस उलटून मोठी जीवितहानी
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनमध्ये रविवारी एका एक्स्प्रेस वेवर बस उलटल्याने 27 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर या दुर्घटनेत 20 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बचाव अन् मदतकार्य घटनास्थळी पोहोचले आहे. गुइझोऊ प्रांताची राजधानी गुइयांग शहरापासून काही अंतरावर असलेल्या संदू काउंटीत ही दुर्घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


गुइझोऊ प्रांत हा तुलनेत गरीब अन् दुर्गम आहे. तसेच येथे अनेक अल्पसंख्याक समुदायांचे वास्तव्य आहे. जून महिन्यात या प्रांतात रेल्वे रुळावरून घसरून दुर्घटना झाली होती. तर मार्च महिन्यात विमान दुर्घटनेत 132 जणांना जीव गमवावा लागला होता.