Tarun Bharat

कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये भीषण अपघात; तीन जण गंभीर जखमी

गोकुळ शिरगाव वार्ताहर

कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये मुख्य रस्त्यावर गुरुवार दिनांक 8 रोजी सकाळी 11 वाजता इनोव्हा कार व मोटरसायकल यांच्यामध्ये भीषण अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.

या अपघातामध्ये पंकज कुमार व सोनू कुमार राहणार मेट्रो पार्क, कागल पंचतारांकित एमआयडीसी, सुजित गोपी जांभेकर यांच्यासह इतर तिघांचा अपघात झाला. यामध्ये एकूण सहाजण जखमी झाले असून तिघाजणांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताच्या ठिकाणचे दृश्य अतिशय भीतीदायक होते. इनोवा गाडीत एका खाजगी कंपनीचे बिल्डर होते. या घटनेची फिर्याद सागर यादव यांनी दिली असून तपास सहायक फौजदार तिवडे करीत आहेत.

Related Stories

अंबाबाई दक्षिणा पेटीत 67 लाख 65 हजार रुपये प्राप्त

Abhijeet Khandekar

‘आम्ही शस्त्रे ठेवणार नाही, आमची शस्त्रे हेच आमचे सत्य आहेत’ : झेलेन्स्की

Abhijeet Khandekar

Satara; अमोल यादव यांची युरोप येथे ऑलम्पिक दर्जाच्या कुस्ती प्रशिक्षणासाठी निवड

Abhijeet Khandekar

कोरोना काळात बंद केलेल्या रेल्वे सुरू करा : रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

Abhijeet Khandekar

जिल्ह्यात 2 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान

Kalyani Amanagi

संताजी घोरपडे स्वराज्याचे एकनिष्ठ योद्धे : प्रा. डॉ. जयसिंगराव पवार

Archana Banage