ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर भरधाव वेगातील कारने ट्रकला पाठिमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. उर्से टोल नाक्याजवळ सकाळी 7.45 च्या सुमारास हा अपघात झाला.
विजय विश्वनाथ खैर (रा. सातारा) असे अपघातात मृत्यू झालेल्या एकाचे नाव असून, दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील उर्से टोल नाक्याजवळ एक ट्रक बिघाड झाल्यामुळे रस्त्यालगत उभा करण्यात आला होता. आज सकाळी 7.45 च्या सुमारास एका भरधाव वेगातील कारने या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही कार मुंबईकडून पुण्याकडे येत होती. या कारची धडक एवढी जोरदार होती की, आर्धी कार ट्रकखाली घुसली. या भीषण अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून, ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
अधिक वाचा : खूशखबर! महिलांना आजपासून एसटी प्रवासात 50 टक्के सवलत लागू