Tarun Bharat

राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ. प्राची पवार यांच्यावर टोळक्याकडून जीवघेणा हल्ला

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आणि प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्राची पवार (Prachi Pawar) यांच्यावर अज्ञात टोळक्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात प्राची पवार गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी रात्री गोवर्धन शिवारात ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राची पवार या मंगळवारी रात्री दुचाकीवरुन गोवर्धन शिवारातील आपल्या फार्म हाऊसमध्ये गेल्या होत्या. यावेळी हल्लेखोरांपैकी दोघेजण फार्म हाऊसलगतच्या झाडीत लपून बसले होते. प्राची यांनी त्यांना हटकले असता, हल्लेखोरांनी प्राची यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर ते पळून गेले. हल्ल्यात जखमी झालेल्या प्राची यांच्यावर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अधिक वाचा : RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी

दरम्यान, या घटनेने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली असून, हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरु केलं आहे.

Related Stories

उजनीचा उजवा कालवा फुटला; शेकडो एकर क्षेत्र पाण्याखाली, पिकांचं मोठं नुकसान

datta jadhav

मंकीपॉक्सचा आजार; नेमकी काय आहे परिस्थिती…

Rahul Gadkar

पाण्यात चाळण असल्याने ‘ते’ दोघे बुडाले

Archana Banage

पुण्यात गुंतवणुकीच्या आमिषाने 300 कोटींची फसवणूक

datta jadhav

“ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकार घटनादुरुस्ती का करत नाही?”

Archana Banage

”गुजरातमध्ये ६ हजार कोटींचा कोळसा घोटाळा”

Abhijeet Khandekar