Tarun Bharat

13 वर्षांच्या मुलीवर पित्याचे अत्याचार

Advertisements

वेल्लोर / वृत्तसंस्था

प्रत्यक्ष जन्मदात्या पित्यानेच 13 वर्षांच्या आपल्या कन्येवर बलात्कार केल्याची थरकाप उडविणारी घटना तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्हय़ातील एका खेडय़ात घडली आहे. पित्याने तिच्यावर अनेक महिने अत्याचार केले. त्यामुळे ती मुलगी गर्भवती झाली. तिने काही दिवसांपूर्वी एका अपत्याला जन्म दिला आहे. ही मुलगी आठव्या इयत्तेत शिकत असून पित्याच्या वासनेची शिकार बनली होती.

तिच्या पोटात दुखू लागल्याने एका नातेवाईकाने तिला रुग्णालयात दाखल केले. तेथे ती गर्भवती असल्याचे समजून आले. त्यानंतर वेल्लोरच्या महिला पोलीस स्थानकात तक्रार सादर करण्यात आली आहे. ही मुलगी आणि तिचा भाऊ त्यांच्या आजोबा-आजींकडे राहतात. तेथेच या मुलीचे तिच्या पित्याने अनेक महिने लैंगिक शोषण केले, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. पित्याने हा प्रकार उघड केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे आपण आपल्यावर होणाऱया अत्याचारासंबंधी आधी तोंड उघडले नाही, असे तिने पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारींमध्ये स्पष्ट केले आहे.

पित्याला आता अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्याच्यावर पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून या मुलीचे नाव नियमाप्रमाणे गुप्त ठेवण्यात आले आहे.

Related Stories

महाकाल मंदिराखाली आणखी एक मंदिर

Omkar B

एलओसीवर भूसुरुंगाचा स्फोट, दोन जण हुतात्मा

Patil_p

जम्मू-काश्मीर, दिल्ली, मध्यप्रदेशात सीबीआयचे छापे

Patil_p

तबलिगी जमातीचे प्रमुख मौलाना साद यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल

prashant_c

विनयशंकर तिवारींसमोर वर्चस्व राखण्याचे आव्हान

Patil_p

‘गिनीज बुका’त प्रवेशलेले हनुमान मंदीर

Patil_p
error: Content is protected !!