Tarun Bharat

पित्याकडून मुलगा-मुलीसह सासूवर चाकूहल्ला

कंग्राळी बुद्रुक येथील घटना : माथेफिरुची यथेच्छ धुलाई

वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक

माथेफिरु नवऱयाकडून पत्नी, मुलांसह सासूला संपविण्याचा डाव जागरुक नागरिकांमुळे उधळला. मात्र, या झटापटीत माथेफिरुने सासू, मुलगा व मुलगी यांच्यावर चाकूने खुनी हल्ला केला आहे. यावेळी नागरिकांकडून त्या माथेफिरुची यथेच्छ धुलाई करत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सदर घटना गुरुवारी रात्री 9 वाजता कंग्राळी बुद्रुक येथील नेताजी गल्लीमध्ये घडली.

हनुमाननगर येथील दीपक वाके याचा पंधरावर्षांपूर्वी कंग्राळी बुद्रुक येथील कल्पना यल्लाप्पा हुरुडे (सध्याची दीपा वाके) हिच्याबरोबर विवाह झाला होता. विवाह करतेवेळी दीपक हा बेंगळूर येथील एका कंपनीमध्ये नोकरीला आहे, असे खोटे सांगून लग्न केले. प्रत्यक्षात तो कोणत्याच कंपनीमध्ये नोकरीला नव्हता. आपली फसगत झाल्याचे समजूनही दीपाने सुखी संसाराची स्वप्ने रंगवून संसाराला सुरुवात करून एका कपडय़ाच्या दुकानात नोकरी पत्करली. दरम्यानच्या काळात दीपकला दिया व दिनेश ही दोन अपत्ये झाली.

त्यानंतर दीपक व्यवस्थित राहत नसल्यामुळे गेल्या महिन्यापासून दीपा कंग्राळी बुद्रुक येथे आपल्या माहेरी राहू लागली. एक वर्ष दीपक हा येथेच राहू लागला. परंतु गेल्या वर्षभरापासून तो त्यांनाही सोडून वरचेवर पत्नी, मुले, सासू यांना जीवे मारण्याची धमकी देत होता. गुरुवारी रात्री त्याने कहरच करून सासू, मुलगा, मुलगी यांच्यावर खुनी हल्ला केला.

खुनी हल्ल्यामध्ये सासू यल्लुबाई यल्लाप्पा हुरुडे यांच्या छातीवर चाकूने वार केला. मुलगा दिनेश याच्या डोक्यावर वर्मी हल्ला केला. तर मुलगी दिया हिच्यावर सुद्धा चाकूने हल्ला केला. लागलीच जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू केले.

माथेफिरुचा बेत फसला

माथेफिरु दीपक वाके सासू, पत्नी, मुलगा, मुलगी यांना जीवे मारून स्वतः सुद्धा संपवून घेणार होता. परंतु पत्नी दीपा वाके ही बेळगाव येथील कापड दुकानात नोकरीला असल्यामुळे ती उशिरा आली. तसेच जागरुक नागरिकांच्या प्रतिकारामुळे त्याचा हा डाव फसल्याचे उपस्थित नागरिकांमध्ये चर्चा होत होती.

108 गाडीतून हॉस्पिटल पाठविले

माथेफिरु दीपक वाकेला शेवटी उशिरा पोलीस व उपस्थित नागरिकांकडून 108 रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी हॉस्पिटलला पाठविण्यात आले.

घटनास्थळी काकती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आय. एस. गुरुनाथ व त्यांचे सहकारी दाखल होऊन पुढील तपास सुरू आहे. रात्री उशिरा एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Related Stories

ग्रामीण विकास पंचायत राज आयुक्तांची रोपवाटिकेला भेट

Omkar B

चारा, पाणी प्रश्नाबाबत आतापासूनच काळजी घेणे गरजेचे

Amit Kulkarni

भिंत कोसळून मेंढपाळ मामा-भाच्याचा मृत्यू

Patil_p

खानापूर-अनमोड मार्गाचे काम ठेकेदाराकडून अर्धवट

Amit Kulkarni

आता मनपा स्वच्छता निरीक्षकही आधार लिंकच्या कामी

Amit Kulkarni

वादळी पावसामुळे शेतकऱयांचे लाखोंचे नुकसान

Amit Kulkarni